आमदार किशोर आप्पा पाटील यांचा आज नागरी सत्कार.

मुख्य संपादक: सतिश गोपाळ
(पाचोरा) दि: 12/10/2024

पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोड जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवीन पूर्णाकृती पुतळ्याच्या निर्मीतीबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल समस्त शाहू, फुले, आंबेडकरी जनतेच्या वतीने पाचोरा, भडगाव तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांचा आज सकाळी ठीक दहा वाजता जाहीर नागरी सत्कार आयोजित केला आहे. तसेच या पूर्णाकृती पुतळ्याचे शिल्पकार तसेच वास्तू विशारद हे उपस्थित राहणार असून त्यांना या पुतळा उभारणीचे काम दिले जाणार आहे.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष मा. श्री. संजय गोहिल, मुख्याधिकारी मा. श्री. मंगेश देवरे यांच्यासह समस्त आंबेडकर प्रेमी, नागरिक, बंधू आणि भगिनींची उपस्थिती लाभणार आहे. तरी जास्तीत, जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.