मुख्य संपादक :सतिश गोपाळ
(पाचोरा) दि: 10/10/2024
देशातील प्रसिद्ध उद्योगपती *भारतरत्न रतनजी टाटा* यांचे शुक्रवारी रात्री मुंबई येथे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली असल्याने राज्य शासनाने एक दिवसाचा *शासकीय दुखवटा* जाहीर केला आहे. त्यामुळे आज गुरूवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी होणारे सर्व *शासकीय कामकाजांचे भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत,*
यात प्रामुख्याने गाडगेबाबा नगर येथील रस्त्या कामांचे भूमिपूजन तसेच काकणबर्डी येथे पर्यटन विकास निधीतून साकारलेल्या कामांचे लोकार्पण क्रीडा संकुलाचे भूमिपूजन व कृषी भवन याचे भूमिपूजन या कार्यक्रमांचा समावेश आहे. *सदरील कार्यक्रम उद्या शुक्रवारी दिनांक 11/10/2024 रोजी दुपारी 4 वाजता घेण्यात येतील* त्याबाबत सर्वांना माहिती कळविण्यात येईल. झालेल्या बदलाची कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी ही विनंती. आपला *किशोर आप्पा पाटील* आमदार पाचोरा भडगाव




