मुख्य संपादक: सतिश गोपाळ
(पाचोरा)दि:15/10/2024
जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपले असून यात पाचोरा व भडगाव तालुक्यातील कापूस पिकांसह इतर पिकांचे तसेच गुरांसाठी साठवून ठेवलेल्या भुस व चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सततच्या पावसामुळे खरीपाचे पिक घेण्यासाठी शेती मशागतीची कामे खोळंबली असल्याने वेळेवर लागवड करतांना अडचणीचे ठरत असल्याचे सांगत ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याशी तातडीने संपर्क साधून कोणत्याही परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे.या गंभीर विषयावर आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा, भडगाव तालुक्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचा आढावा घेऊन तातडीने पत्रकार परिषद घेऊन झालेल्या नुकसानी विषयावर सविस्तर खुलासा देत सोयाबीन, मका ही पिके काढणीला आली असतांनाच तसेच कापूस मोठ्या प्रमाणात झाडावर असतांना वेचणी करत असतांनाच सततच्या पावसामुळे हाताशी आलेल्या या पिकांचे जवळपास ८०% नुकसान झाले आहे.
https://youtu.be/u29CAM1VG_0?si=cmy2oTHHsSJ37ylI
तसेच पावसाने भिजलेले मका व सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच शेतातून वेचून आणलेला ओला कापून वाळत घातला जात नसल्याने सरकीला कोंब फुटत आहेत.सुरवातीला निसर्गाने चांगली साथ दिली होती म्हणून पिके चांगल्याप्रकारे बहरली होती परंतु आता सततच्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास ऐनवेळी हिरावून घेतला गेला असल्याने आधिच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्याला जर जीवदान देण्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पंचनाम्याची वाट न पाहता ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट नुकसानभरपाई जाहीर करावी अशी मागणी व सुचना प्रशासनाला केल्या असल्याची माहिती आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतली आहे.या पत्रकार परिषदेला शिवसेना (शिंदे गट) राज्य प्रवक्ते प्रदीप देसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पद्मसिंह पाटील उपस्थित होते.




