पाचोरा तालुक्यातील सार्वे प्र. लो. जामने शिवारात बिबट्याचा कुत्रावर हल्ला.

0
353

मुख्य संपादक: सतिश गोपाळ

(पाचोरा) दि.21/09/2024

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या सार्वे, जामने शिवारातील सार्वे प्र. लो. शिवारातील केशव चिंधा पाटील यांच्या मालकीच्या गट नंबर १६० मध्ये शेतात पत्र्याचे शेड बांधले आहे. या शेडमध्ये एका कुत्रीने पिल्लांना जन्म दिला होता म्हणून शेडचा दरवाजा उघडाच ठेवला होता. याच वेळात दिनांक २० सप्टेंबर शुक्रवार रोजी रात्री या शेडमध्ये घुसून बिबट्याने कुत्री व तिच्या पिल्लांना ठार केल्याची घटना दिनांक २१ शनिवार रोजी सकाळी उघडकीस आली असून केशव चिंधा पाटील यांच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.

यामुळे सार्वे, जामने शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाल्यापासून जीविताला घोका निर्माण झाला असल्याने
या शिवारातील शेतात शेतकरी व शेतमजूर येण्यासाठी तयार नाहीत तसेच पशुधन चारण्यासाठी अडचणी येत आहेत तसेच शेती मशागतीची कामे खोळंबली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत कारण आताच पावसाने उघडीप दिली होती व शेती मशागतीची कामे करणे गरजेचे आहे परंतु या शिवारात बिबट्याचा वावर वाढला असल्याने तसेच येत्या आठवडाभरात भरपूर पाऊस पडणार असल्याचे संकेत मिळत नसल्याने शेतीची मशागत न झाल्यास हंगाम हातचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करुन दुसरीकडे सोडण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.