मुख्य संपादक: सतिष गोपाळ
पाचोरा दि.१४/०९/२०२६
पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील रहिवासी दिलीप फुलचंद चोपडा जैन यांची कन्या कुमारी वैष्णवी जैन हिने जैन धर्मातील तपश्चर्येची परंपरा जोपासत आठ उपवास पूर्ण केले आहेत. नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या वैष्णवीने श्रद्धा, संयम आणि दृढनिश्चयातून केलेल्या या तपश्चर्येचे जैन समाजासह परिसरातून कौतुक होत आहे.
कुमारी वैष्णवी जैन हिने धार्मिक भावनेतून सलग आठ उपवासांची तपश्चर्या पूर्ण केली. विद्यार्थिदशेत असतानाही तिने केलेल्या या तपश्चर्येमुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजबांधवांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
या तपश्चर्येची सांगता मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी पाचोरा येथील जैन स्थानकात होणार आहे. यावेळी धार्मिक वातावरणात विविध विधींसह वैष्णवीच्या तपश्चर्येची सांगता करण्यात येणार आहे.
कमी वयात आठ उपवासांची तपश्चर्या पूर्ण करणाऱ्या वैष्णवी जैन हिच्या संयमाचे आणि धार्मिक निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक व धार्मिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
“महावीर आय नमः” या मंगल भावनेतून तपश्चर्येची सांगता होणार आहे.




