पहूर परासरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन पळवून नेणाऱ्या भोंदु बाबांच्या पहूर पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

0
216
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

मुख्य संपादक :सतिश गोपाळ

(पाचोरा) दि :25/09/20

जामनेर तालुक्यातील काही गावात व काही धर्मस्थळांवर काही भोंदु बाबांनी आपले बस्तान बसवून त्याठिकाणी गोरगरीब, भोळ्याभाबड्या व समस्येने त्रस्त असलेल्या लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत आपल्या जाळ्यात ओढून करणी, कवटाळ करण्याच्या नावाखाली तसेच ईडा, पिडा टाळण्यासाठी गंडा, दोरा, तावित तसेच बोकड, कोंबड्यांचा बळी द्यायला लावून तसेच धन काढण्यासाठी अल्पवयीन मुलीवर काजळी लावून अघोरी उपाय करुन या भोंदु बाबांनी लाखो रुपयांची मालमत्ता कमावली आहे.

या अंधश्रद्धेच्या विरोधात सत्यजित न्यूजच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवण्यात आला होता. मात्र समाजातील ठेकेदार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच इतर जबाबदार घटकांनी या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज या हरामखोर भोंदु बाबांची हिंमत वाढली असल्याचे जीवंत उदाहरण म्हणजे पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खेडेगावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तीच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक भोंदु बाबा त्याचे दोन सहकारी व अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेत तेलंगणा राज्यातून अटक केली असून भोंदु बाबा व त्याच्या दोन सहकाऱ्यांना मा. न्यायालत हजर केले असता संशयित आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिनांक ११ सप्टेंबर २०२४ बुधवार रोजी मुलीच्या आईवडिलांनी पहूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. ही तक्रार दाखल झाल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मा. श्री. महेश्वर रेड्डी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पोलीस स्टशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांनी उपनिरीक्षक गणेश सुस्ते, हेड कॉन्स्टेबल रविंद्र देशमुख, दिपक सुरवाडे, ज्ञानेश्वर ढाकरे, विनोद पाटील यांचे एक पथक तयार करुन सदर गुन्ह्यांच्या तपासकामी पाठवले होते.

या नेमणूक करण्यात आलेल्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप आदेशानुसार व गुप्त खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रथम सोलापूर येथे रवाना झाले होते. तेथे गेल्यावर संबंधित संशयित आरोपी अपहरण करण्यात आलेल्या मुलीसह तेलंगणा राज्यात असल्याचे समजले तेलंगणा राज्यात गेल्यावर मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे पंचकुडा नावाच्या गावात जाऊन त्या गावातील एका घरातून अल्पवयीन पिडीत मुलीसह तीन जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर अटकेतील संशयित आरोपी याच गावात मोलमजुरी करुन रहात होते व याच गावातील घरात त्यांनी मुलीप्रमाणे असलेल्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने तीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

अल्पवयीन मुलीसह अपहरण करुन पळवून नेणाऱ्या जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील संशयित भोंदु बाबा सुरेश भगवान भील वय वर्षे (२९) तसेच पहूर येथील म्हाडा कॉलनीत राहणारे रवी धनराज हिवराळे वय वर्षे (२५), लहू शिवाजी गायकवाड वय वर्षे (२०) या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पहूर येथे आणण्यात आल्यावर पिडीत मुलीने महिला दक्षता विभाला दिलेल्या जबाबावरुन मा. विशेष न्यायालयाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार वाढीव कलम लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आज संबंधित संशयित आरोपी हे पहूर पोलीसांच्या कस्टडीत असून या अपहरण करुन पळवून नेलेल्या पिडीत मुलीचा धन काढण्यासाठी उपयोग करण्याचा संबधितांचा उद्देश असावा असा संशय पहूर पोलीसांनी व्यक्त केला असून या पहूर पोलीसांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल जामनेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे.

********************************************************
महत्वाचे ~ पकडा गया ओ चोर हैं, बाकी सब शिरजोर है।
********************************************************
आजच्या परिस्थितीत हि घटना उघडकीस आली असून संबंधित संशयित भोंदु बाबा व त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. असली तरी अजून जामनेर तालुक्यातील धार्मिक स्थळांवर तसेच गल्लीबोळातील एकांतात असलेल्या काही घरांमध्ये भोंदु बाबांनी आपले बस्तान बसवले असून याठिकाणी हे भोंदु बाबा समस्यांनी त्रस्त असलेल्या अंधश्रद्धेने पाडलेल्या व काही लोकांच्या अज्ञानतेचा फायदा घेत अमावस्या, पौर्णिमा व इतर काही दिवशी दरबार भरवतात व याठिकाणी ते गंडा, दोरा, तावित, डोक्यावरुन लिंबू कापून फेकणे, महिलांना एकांतात नेऊन अंघोळ घालणे, नवस फेडण्यासाठी बोकड, कोंबड्यांचा बळी देणे, जमिनीतील धन काढण्यासाठी काजळी लावणे, इच्छापूर्ती करण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न करणे असे अघोरी उद्योग करत आहेत.

ही घटना उघडकीस आली असली तरी आजही पाचोरा व जामनेर तालुक्यात काही भोंदु बाबांनी वेगवेगळ्या धर्म स्थळावर अनाधिकृत पुणे ताबा मिळवून धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी येणाऱ्या भोळ्याभाबड्या जनतेच्या भावनांचा आधार घेत कुणाला मुलबाळ होत नसेल, कुणाला काही शारीरिक आजार असतील किंवा त्यांच्या घरात इतर समस्या असतील तर त्या सोडविण्यासाठी मंत्रोच्चारात धागा, गंडा, दोरा, तावित करत त्यांच्याकडून हजारो रुपये घेऊन लुबाडणूक करत आहेत अशा तक्रारी सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केल्या असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून या भोंदु बाबांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

असाच काहीसा प्रकार शेंदुर्णी येथील एका धर्म स्थळावर सुरु असून याठिकाणी येणाऱ्या भाविकांवर संबंधित भोंदु बाबा मंत्रोच्चारात धागा, गंडा, दोरा, तावित करत डोक्यावरुन लिंबू कापून फेकत हजारो रुपये घेऊन लुबाडणूक करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यात मुख्यत्वे करुन शेंदुर्णी गावातील सोयगाव रस्त्यावर तसेच शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्यावर असलेल्या श्री. मम्मा देवि मंदिराजवळील एका दर्ग्यावर गुलाब बाबा, शेंदुर्णी येथून जवळच असलेल्या मोराड गावातील स्वयंघोषित श्रावण बाबा उर्फ इच्छापूर्ती बाबा हे भोंदु बाबा आजही वेगवेगळ्या धर्मस्थळांवर तसेच बाहेरगावी जाऊन जमेल तेथे अंधश्रद्धेचा बाजार भरवून तंत्र, मंत्र, गंडा, दोरा, तावित, डोक्यावरुन लिंबू कापून फेकणे, महिलांना एकांतात नेऊन अंघोळ घालणे, नवस फेडण्यासाठी बोकड कोंबड्यांचा बळी देणे जमिनीतील धन काढण्यासाठी काजळी लावणे इच्छापूर्ती करण्यासाठी जीवंत बकऱ्या, कोंबड्यांचा बळी द्यायला लावून नवस फेडणे असे अघोरी उपाय आजही करत आहेत.

विशेष म्हणजे या काही भोंदु बाबांनी आजपर्यंत लाखो व काहींनी करोडो रुपयांची मालमत्ता कमावली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या भोंदु बाबांची लुच्चेगिरी कायमस्वरुपी बंद करुन यांच्या मालमत्तेचे चौकशी लावण्यासाठी सत्यजित न्यूजच्या माध्यमातून संबंधित विभागाकडे तसेच पोलीस विभगाकडे रितसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.