मुख्य संपादक: सतिष गोपाळ
(पाचोरा)दि.०७/०१/२०२६
६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने श्वेता सीमा विनोद पाटील यांच्या पक्ष कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी परिसरातील सर्व पत्रकार बंधूंना आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकारांचा उपयुक्त भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या प्रसंगी चहापानाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान श्वेता सीमा विनोद पाटील यांनी पत्रकारांशी थेट संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
त्या म्हणाल्या की, “मी काही चांगलं केलं तर त्याचं कौतुक करा, पण जर कधी चुकीचं वागले तर निर्भीडपणे टीका करा. पत्रकार समाज घडवण्याचं काम करत असतो. हा समाज अधिक चांगला व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे.”
त्यांनी पत्रकारितेच्या सामाजिक जबाबदारीवर भर देत पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक मजबूत होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास किशोर लोहार, रविशंकर पांडे, दिलीप जैन, हेमशंकर तिवारी, सुनील लोहार, गजानन लाधे, चंद्रकांत माहोर, भिकन पाटील, राजू ठाकूर, दीपक मुलमुले, ईसा तडवी, विजय राजपूत, रोशन जैन, विनोद काटे, सतीश गोपाळ, भाजपा आध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष संदीप पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.




