विद्यार्थी संघ संचलित मूकबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करून पिंपळगाव परिसरातील आगळावेगळा पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

मुख्य संपादक: सतिष गोपाळ 

(पाचोरा)दि.०६/०१/२०२६

मराठी पत्रकारितेचे जनक बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीमती कल्याणी वर्मा मॅडम एपीआय पिंपळगाव हरेश्वर, पत्रकार बंधू पिंपळगाव परिसर व विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांचे हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी पत्रकार सुनील लोहार, किशोर भाऊ लोहार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्रावर खालील प्रमाणे विचार मांडले. महाराष्ट्रात दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे केवळ पत्रकारांचा सन्मान करण्याचा सोहळा नसून, समाजातील पत्रकारितेच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस त्यांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि निर्भीड पत्रकारितेच्या परंपरेचा पुनरुच्चार करतो.

इ.स. १८३२ साली ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजप्रबोधनाची मशाल पेटवली. त्या काळात ब्रिटिश राजवटीखाली असलेल्या भारतात सत्य मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे धाडसाचे काम होते. मात्र जांभेकरांनी ज्ञान, विज्ञान, सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रहित या विषयांना प्राधान्य देत पत्रकारितेला दिशा दिली. त्यांनी पत्रकारितेला केवळ बातम्यांचे माध्यम न ठेवता समाजशिक्षणाचे प्रभावी साधन बनवले.
मुख्याध्यापक ईश्वर पाटील सर यांनी पत्रकार दिनाच्या उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा दिल्या तसेच पत्रकार करीत असलेल्या कामाचा गौरव करून विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने आभार मानले. मा.श्रीमती कल्याणी वर्मा एपीआय पिंपळगाव (हरेश्वर) यांनी सर्व पत्रकार बंधूं कडून समाजाला व पोलिसांना सहकार्य करण्याबद्दल आवाहन केले.आजच्या काळात पत्रकारितेची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. छापील माध्यमांबरोबरच इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांनी माहितीचे स्वरूप बदलले आहे. माहिती क्षणार्धात लोकांपर्यंत पोहोचते; मात्र त्याचबरोबर अफवा, अर्धसत्य आणि सनसनाटीपणाचे आव्हानही वाढले आहे. अशा परिस्थितीत पत्रकाराची जबाबदारी अधिक कठीण आणि अधिक महत्त्वाची बनली आहे.

मुख्याध्यापक ईश्वर पाटील सर यांनी पत्रकार दिनाच्या उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकार करीत असलेल्या कामाचा गौरव केला. पत्रकारिता करताना निर्भीड व प्रखर प्रमाणे करावी. ही अपेक्षा केली. सर्व पत्रकार बंधूंनी आपल्यातर्फे विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने आभार मानले.

सदर प्रसंगी पिंपळगाव परिसरातील पत्रकार बंधू किशोर लोहार, भिकन पाटील, राजू ठाकूर, दीपक मुलमुले, रोशन जैन, चंद्रकांत मोहोर, सुनील लोहार,दिलीप जैन,हेंमशंकर तिवारी, रविशंकर पांडे, ईसा तडवी, विनोद पाटील, सतिष गोपाळ.

विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक गोविंद महाजन यांनी केले.