सौ वैशालीताई सूर्यवंशी या बाई पण लय भारी विधानसभेची उमेदवारी करून पुरुषांना पडताय भारी.

मुख्य संपादक: सतिश गोपाळ

(पाचोरा) दिनांक: 25/10/2024

 पाचोरा येथील विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून पाचोरा शहर व तालुक्यात प्रचंड उत्साहाचे वातावरण असून जशी जशी दिवाळी जवळ येत आहे तशी तशी उमेदवारांची उत्साहात भेटीगाठी सुरू असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना च्या माध्यमातून आकर्षित करण्याचे प्रयत्न चालू आहे मतदारांनीही निर्णय घेतला आहे यंदाची दिवाळी जोरात गाजवूया उमेदवारांना नाचू या आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी वरखेडी रोड कडील मोकळ्या पटांगणा मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते श्री आदित्य ठाकरे यांची सभा घेऊन फॉर्म भरण्यासाठी सभा आयोजित केली यावेळी सभेच्या वेळी तुफान गर्दी होती महिला व पुरुष तसेच तरुण वर्ग यांनी मोकळे मैदान तुफान गर्दीने भरलेले होते यावेळी श्री आदित्य ठाकरे यांनी वैशालीताई सूर्यवंशी यांना एक वेळा महिला म्हणून संधी द्या सर्व मतदार संघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही सर्वांगीण विकास करण्यासाठी ताई कटिबद्ध असून त्यांच्या घरात राजकारणाचा वारसा असून ताईंकडे समाजकारण राजकारण दोघ गोष्टींचा अनुभव असल्यामुळे ताई या शेतकरी शेतकरी वर्गासाठी न्याय देणारे आहे सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात सांगितले मी शेतकरी ची मुलगी असून मला शेतीचे ज्ञान असल्यामुळे शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी मी आहे मतदारसंघात कोणावर अन्याय होणार आहे यासाठी मी आपल्या सेवेत आहे मी एक महिला असून मला तालुक्याची व शहराची जाण आहे मला स्वतःला काही स्वार्थ नसून मी फक्त विकासाच्या कामावर भर देणार असा विश्वास सभेत दिला यावेळी स्टेजवर अनेक मान्यवर उपस्थित होते.