
मुख्य संपादक: सतिश गोपाळ
(पाचोरा)दि:26/10/2024
सद्यस्थितीत विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सगळीकडे उमेदवार गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत. याच कालावधीत पैशाचा गैरवापर होऊन निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी पैशाचा वापर होऊ नये म्हणून आचारसंहिता कालावधीत सगळीकडे निवडणूक आयोगाने सगळीकडे पोलीस विभागाच्या मदतीने ठिकठिकाणी चेक पोस्ट उभारुन स्थीर सर्वेक्षण पथकांकडून कडक तपासणी सुरु केली आहे.याच तपासणी मोहिमेत आज दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ शनिवार रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाचोरा ते जामनेर रस्त्यावर वडगाव आंबे जवळील वडगाव जोगे फाटा येथील चेक पोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथकात कार्यरत असलेले कृषी अधिकारी प्रताप खाडे, पोलीस कॉन्स्टेबल दिपक पाटील व किरण परदेशी यांनी सकाळी अकरा वाजता शेंदुर्णी कडून पाचोरा जाणाऱ्या एम. एच. ०४ जी. एफ. २२ या क्रमांकाच्या मालवाहू टेम्पोची झाडाझडती घेतली असता गाडीमध्ये बसलेले इसार बागवान व संबंधित गाडी चालक शेख अबुझर शेख हकीम राहणार ढाल सांगवी यांच्याकडे एक लाख रुपये आढळून आहेत.
ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल बेहेरे, हवालदार अभिजित निकम व दिपक अहिरे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली व रितसर पंचनामा करुन एक लाख रुपये ताब्यात घेतले व संबंधित वाहन चालकाला पुढील कारवाईसाठी पाचोरा येथे रवाना केले असून याबाबत वाहन चालकाला विचारले असता आम्ही पाचोरा येथे बारदाण घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले आहे.



