मुख्य संपादक: सतिश गोपाळ
(पाचोरा)दि.23/10/2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ४५ जणांना उमेदवारी देण्यात आली असून पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्याआधीच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी २४ ऑक्टोबर २०२४ गुरुवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर केली असून ते उद्या सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाची पहिली यादी जाहीर केली असून काल रात्री उशिराने ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. शिवसेना पक्षाकडून पहिल्या यादीत ४५ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून यात विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. तसेच दुसरीकडे सेनेच्या ज्या नेत्यांना यापूर्वी संधी दिली नव्हती त्यांना संधी देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे.याच दरम्यानच्या गेल्या दहा वर्षांपासून पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील करत आहेत. परंतु मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अमोल शिंदे यांनी निवडणूक लढवली होती व आता सद्यस्थितीत ते भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष असल्याने तेही भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. यामुळे पाचोरा, भडगाव विधानसभा निवडणुकीत नेमकी ही जागा कुणाला मिळणार याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु आता महायुतीकडून शिंदे गट शिवसेनेच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली असल्याने ते आता नक्कीच हॅट्रिक करतील यात शंका नाही.




