जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले दत्त माध्यमिक विद्यालयाच्या चौकशीचे आदेश.

मुख्य संपादक: सतिश गोपाळ

(पाचोरा) दिनांक: 21/10/2024

पाचोरा तालुक्यातील दत्त माध्यमिक विद्यालय हे बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या ताब्यात गेल्यापासून या दत्त माध्यमिक विद्यालयाच्या बाबतीत दररोज नवनवीन तक्रारी समोर येत असून बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष हे मनमानी कारभार करत आहेत. असा आरोप लोहारी गावच्या सरपंच सौ. रंजनाताई पाटील व विशाल नेवे यांनी माध्यमिकचे महाराष्ट्र शासन शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव व पाचोरा येथील माध्यमिकचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रारी केल्या होत्या व या तक्रारी अर्जाच्या प्रती अधिक माहितीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.

ही तक्रार करण्यामागचा हेतू हाच आहे की जेव्हापासून दत्त माध्यमिक विद्यालय हे बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या ताब्यात गेले आहे तेव्हापासून या दत्त माध्यमिक विद्यालयात मनमानी कारभार सुरु आहे. विशेष म्हणजे दत्त माध्यमिक विद्यालय हे बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनने घेतल्यापासून बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनने लोहारी येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या चार शाळा खोल्या भाड्याने घेऊन त्याठिकाणी हे आपले वर्ग भरवत आहेत परंतु आजपर्यंत बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या अध्यक्षांनी एक रुपयाही भाडे भरलेले नाही. तसेच याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नसून शालेय पोषण आहार हा उकिरड्या सारखा पडलेला असल्याचे आढळून आले होते. तसेच शाळा खोल्यांमध्ये साफसफाई केली जात नसून मुला, मुलींसाठी स्वच्छता गृह नाही. तसेच शाळेच्या प्रांगणात जणू तलाव साचला असून यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होऊन हे डास विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व शाळेत पटसंख्या कमी असल्यावर ही खोटी पटसंख्या दाखवून शासनाच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याचा आरोप लोहारी गावच्या सरपंच सौ. रंजनाताई पाटील व विशाल नेवे यांनी केले आहेत.

या तक्रारी अर्जाची दखल घेऊन जिल्हापरिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मा. कल्पना चव्हाण यांनी दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ मंगळवार रोजी पाचोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना नोटीस पाठवून अर्जात नमूद केलेल्या तक्रारीची दखल घेऊन लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयात जाऊन प्रत्यक्ष तक्रारदारासमोर चौकशी करुन आर. टी. ई. अधिनियम २००९ नुसार विद्यार्थ्यांसाठी शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाही, प्रत्येक वर्गातील पटसंख्या व प्रत्यक्ष हजर विद्यार्थी संखेची चौकशी तसेच दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी लोकमत वृत्तपत्रात शिक्षक भरतीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करुन पत्र मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हापरिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मा. कल्पना चव्हाण यांनी दिले आहेत.१५ ऑक्टोबर २०२४ मंगळवार रोजी हे पत्र पाचोरा गटशिक्षणाधिकारी यांना पाठवण्यात आले असले तरी आजपर्यंत एकही अधिकाऱ्यांनी लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयात येऊन चौकशी केली नसल्याची खात्रीलायक माहिती सत्यजित न्यूज कडे प्राप्त झाली आहे.‌ तसेच लोहारी गावच्या सरपंच सौ. रंजनाताई पाटील व विशाल नेवे यांनी वारंवार तक्रार करुनही तसेच लोहारी गावातील ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत सत्यजित न्यूज कडून वारंवार वृत्त प्रसारित करुनही तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी करुन कोणतीही कारवाई केली नसल्याने संबंधित अधिकारी हे अर्थपूर्ण डोळेझाक करत तर नाहीत ना अशी शंका लोहारी गावातील सुज्ञ नागरिक व्यक्त केली आहे.