मुख्य संपादक: सतीश गोपाळ
(पाचोरा)दि.२९/११/२०२५
पाचोरा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला असून शिवसेनेच्या उमेदवार सौ. सुनीता किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. २९ नोव्हेंबर २०२५) शिवसेना प्रवक्त्या मा. प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांमुळे पाचोरा शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभा शहरातील विविध भागात टप्प्याटप्प्याने पार पडणार असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. डॉ. ज्योतीताई वाघमारे या आपल्या परखड आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वासाठी ओळखल्या जात असून त्या निवडणुकांच्या रणधुमाळीत थेट जनतेशी संवाद साधणार आहेत.
सभांचा तपशील पुढीलप्रमाणे :
सायंकाळी ७.०० वाजता जनता वसाहत, पाचोरा येथे पहिली जाहीर सभा होणार आहे.
यानंतर सायं. ८.०० वाजता मिलिंद नगर, पाचोरा येथे दुसरी सभा आयोजित करण्यात आली आहे.
तसेच सायं. ८.३० वाजता पंचमुखी हनुमान चौक, पाचोरा येथे तिसरी व अंतिम जाहीर सभा पार पडणार आहे.
या सभांमध्ये शिवसेनेची भूमिका, स्थानिक विकासाचा आराखडा तसेच सौ. सुनीता किशोर पाटील यांच्या कार्याचा आढावा मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी सुरू असलेल्या प्रचारात या जाहीर सभांना विशेष महत्त्व दिले जात असून, शिवसैनिकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकूणच पाचोरा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक प्रचाराच्या भूमिकेत उतरली असून, येत्या काळात प्रचार अधिक गती घेण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.




