शेंदुर्णी नगर पंचायत निवडणूक २०२५, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची जोरदार तयारी.

मुख्य संपादक: सतीश गोपाळ
(पाचोरा) दि.२९/११/२०२५
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगर पंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक मंगळवार, २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून प्रचाराला वेग आला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून उज्वला सतीश काशीद या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. मतपत्रिकेतील क्रमांकानुसार उमेदवारांची नावे व चिन्हे जाहीर करण्यात आली असून मतदारांसाठी नमुना मतपत्रिकाही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तसेच प्रभाग क्रमांकासाठी नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून चौधरी उषाबाई सुनिल यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही उमेदवारांचा प्रचार सध्या जोमात सुरू असून शहरातील विविध भागांत बैठका, संपर्क मोहीम व जनसंवाद कार्यक्रम राबविले जात आहेत.
महाविकास आघाडीच्या वतीने मतदारांना आवाहन करण्यात आले आहे की, नगराध्यक्ष पदासाठी एक मत व नगरसेवक पदासाठी एक मत असे दोन्ही मतदान महाविकास आघाडीच्या अधिकृत चिन्हासमोरील बटण दाबून करावे व विकासाभिमुख नेतृत्वाला प्रचंड बहुमताने विजयी करावे.

या निवडणुकीत विकास, पारदर्शक कारभार व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला असून, शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.