मुख्य संपादक: सतिश गोपाळ
(पाचोरा)दि.03/08/2025
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावात काल दिनांक २ ऑगस्ट २०२५ शनिवार रोजी एक इसम त्याच्या रहात्या घरात कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीर, अनाधिकृतपणे गोवंशाच्या जातीची प्राण्यांची हत्या करुन गोमांस विक्री करत असल्याची गोपनीय माहिती छायाचित्रांसह पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कल्याणी वर्मा यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सत्यता पडताळून पाहण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कल्याणी वर्मा यांनी सत्यता पडताळून घ्यावा पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण ब्राम्हणे व नरेंद्र नरवाडे यांना बोलावून घेत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भोकरी येथील संबंधित इसमाच्या घरी जाऊन चौकशी करण्यासाठी सांगितले व तसे काही आढळून आल्यास कारवाई करण्याचें आदेश दिले होते.
या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण ब्राम्हणे व नरेंद्र नरवाडे यांनी पंचनामा व जप्ती करण्यासाठी लागणारे साहित्य सोबत घेत वरखेडी गावत येऊन गोपनीय माहिती देणाऱ्या इसमाला सोबत घेत संबंधित मांस विक्रेत्यांच्या घरी पाहणी करण्यासाठी गेले असता गोपनीय माहिती देणाऱ्या इसमाने एक मजली पत्र्याचे शेड असलेले रहाते घर दाखवून याठिकाणी गोमांस विक्री करत असल्याची माहिती दिली.
या माहितीच्या आधारे पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण ब्राम्हणे व नरेंद्र नरवाडे यांनी घराजवळ जाऊन पाहिले असता घराचा दरवाजा बंद स्थितीत आढळून आला व घराच्या समोर बाहेरील बाजूस असलेल्या कपडे धुण्याच्या जागेवर लालसर रक्ताचे डाग व मांसाचे काही तुकडे दिसून आल्यावर गोपनीय माहिती देणाऱ्याच्या म्हणण्याला दुजोरा मिळाल्यावर बंद घराचा दरवाजा ठोठावला तेव्हा एका इसमाने दरवाजा उघडला तेव्हा पोलीसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अय्युब इसुब कुरेशी असे सांगितले.
संबंधित घरमालकाने नाव सांगितल्यावर व मिळालेल्या गोपनीय माहितीत साम्य आढळून आल्याने पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण ब्राम्हणे व नरेंद्र नरवाडे यांनी घरमालकाला मिळालेल्या गोपनीय माहिती बाबत सविस्तर सांगितले व घराची झडती घेणे गरजेचे आहे असे सांगून घरात प्रवेश केला असता घरातील आतल्या खोलीमध्ये मांस कापण्यासाठी लागणारे साहित्य, त्यात एक लोखंडी लाकडी दांडा असलेली कुन्हाड, २ मोठे कोयते, ३ लोखंडी चाकू, मांस विक्री करण्यासाठी लागाणारा रक्ताने माखलेला तराजू त्यावर चिकटलेले बारीक मांसाचे तुकडे व लाकडी कुंदा व इतर साहित्य मिळुन आले.
यावरुन संबंधित इसमाने गोमांस विक्री करण्यासाठी गोवंशाची कत्तल करुन गोमांस घरातच कुठेतरी लपवून ठेवले असल्याचा संशय बळावल्याने पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण ब्राम्हणे यांनी वरखेडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी ऋषिकेश बोरसे व फॉरेन्सिक तज्ञांना भ्रमणध्वनीवरुन घटनेची सविस्तर माहिती देत बोलावून घेतले थोड्याच वेळात पशुवैद्यकीय अधिकारी व फॉरेन्सिक टिमने घटनास्थळी येऊन पोलीसांसह दोन पंच उपलब्ध करुन घेत घरमालकाला घराची झडती घेत असल्याबाबत सांगून संमती घेत घराची झाडाझडती घेतली.
या झाडाझडतीत अय्युब इसुब कुरेशी यांच्या घराच्या खोलीतील किचन ओट्याखाली निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकचा टब मध्ये गोमांसाचे तुकडे आढळून आले. तसेच किचन ओट्यावर असलेल्या गॅसच्या जळत्या शेगडीवर एका कढईमध्ये शिजवलेले मासांचे तुकडे दिसून आल्यावर पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण ब्राह्मणे यांनी दोन पंचासमक्ष वरील मिळून आलेले कच्चे, पक्के मांस, घराच्या ओट्याजवळ बाहेर अंगणात एका पिशवीत मोठ्या प्राण्याचे सुकलेल्या अवस्थेतील हाडे व कत्तल करण्यासाठी लागणारे साहित्य ताब्यात घेतले आहे.
याबाबत वरखेडी बिटचे पोलीस कॉन्स्टेबल दिपक सदाशिव सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन दिनांक २ ऑगस्ट २०२५ शनिवार रोजी भोकरी येथील अय्युब इसुब कुरेशी वय वर्षे (४८) यांच्या विरोधात सक्षम प्राधिकरणाची पुर्व परवानगी न घेता बेकायदेशीरपणे रहाते घरात गोवंशाच्या जातीच्या जनावरांची हत्या करण्यासाठी गोमांस विक्री करण्यासाठी लागणारे साहित्य व पाच किलो वजनाचे गोमांस बाळगतांना आढळून आल्याने बी. एन. एस. ३२५ प्राण्यांना कुरतेने वागणेस प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११ (१) (एल) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ चे कलम ५, ५ (क), ९, ९ (अ) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कल्याणी वर्मा व त्याचे सहकारी करत आहेत.




