पाचोऱ्यात १३ जुन रोजी अल्का ब्युटी प्लार्नरतर्फे एक दिवसीय सेमिनार व टॅलेंट शो चे आयोजन

सतिश गोपाळ

मुख्य संपादक (पाचोरा)

पाचोरा शहरातील व्यंकट गोपाल मंगल कार्यालयात जारगाव चौफुली*अल्का ब्युटी प्लार्नरतर्फे मुंबई येथील सुप्रसिध्द इंटरनॅशनल मेकअप अॅण्ड हेअर आर्टीस्ट अल्का गोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १३ जुन २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत एक दिवसीय सेमिनार व दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत “टॅलेंट शो” चे आयोजन करण्यात आले असुन सेमिनार करिता प्रवेश फी ३०० रुपये व “टॅलेंट शो” करिता प्रवेश फी ११०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. याप्रसंगी उपस्थितांपैकी . तसेच आयोजकांतर्फे उपस्थितांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असुन उपस्थित सभासदांना सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. या सेमिनार व टॅलेंट शो चा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मेक ओव्हर आर्टिस्ट रश्मी लोढाया, मेक ओव्हर आर्टिस्ट तेजल, मेक ओव्हर आर्टिस्ट हिना शेख, मेक ओव्हर आर्टिस्ट भाग्यश्री सोनार, मेक ओव्हर आर्टिस्ट सुवर्णा गणेश खैरनार यांचेशी संपर्क साधावा असेही आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. या एक दिवसीय सेमिनार व टॅलेंट शो करिता पाचोरा येथील राजलक्ष्मी कलेक्शन यांचे सहकार्य लाभत आहे.