पिंपळगाव हरेश्वर येथे श्री.संत जगनाडे महाराज जयंती व मंगलकार्यालयाचे भूमिपूजन उत्साहात साजरे.

सतिश गोपाळ मुख्य संपादक (पाचोरा) 

संपर्क :८३९०७६२१२४ 

दिनांक :०८/१२/२०२२ 

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे पदमवंशिय तेली आणि चौधरी तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या आज संत श्री. जगनाडे महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुरवातीला संत श्री. जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. तदनंतर दिपप्रज्वलन करून या शुभ दिनाचे औचित्य साधून तेली समाजासाठी बांधण्यात येणाऱ्या मंगलकार्यायाचे भूमिपूजन महाराष्ट्र कमिटीचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. आर. एन. झलवार यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. शांतीलाल तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत वनविभाग नागपूरचे आर. एफ. ओ. मा. श्री. भगवान आर. ढाकरे यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.जयंती चे औचित्य साधून तेली समाज यांचे मंगलकार्यायाचे भूमिपूजन सोहळा ही पार पडला ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळगाव पोलीस स्टेशन चे स पो. निरीक्षक अमोल पवार सर, म क. चे माजी अध्यक्ष प्रदीप भाऊ ढाकरे, राजेंद्र ढाकरे सर,संजयजी झेलवार,संदीप सरताळे, सुभाष जी बिंदवाल, प्रकाश दसरे,सुरेश जी.असरवाल
श्री च्या जयंती निमित्त कु. शौर्या माहोर आणि डॉली तेली ह्या लहान मुलींनी महाराजांविषयी खूप सखोल आणि छान असे भाषण करून पाहुण्यांना मंत्रमुद्ध केले
कार्यक्रमाचे कौतुक करत असताना प्रमुख पाहुण्यांनी वास्तू साठी काही देणग्या जाहीर केल्या यात
डॉ. आर एन झलवार यांनी एक लाख रुपये
माजी अध्यक्ष प्रदीप ढाकरे यांनी 51000₹
डॉ शांतीलाल तेली चार भाऊ मिळून 125000₹च्या वरती रक्कम देण्याचे आश्वाशीत केले
संदीपभाऊ सरताळे आणि राजेंद्र ढाकरे सर यांनी प्रत्येकी 11111₹जाहीर केले, संजय झेलवार सर यांनी 11000₹ च्या वर देणगी देऊ असे सांगितले ह्या व्यतिरिक्त पिंपळगाव कमिटी चे अध्यक्ष चंद्रकांत माहोर, ज्ञानेश्वर तेली,राजेंद्र नैनाव,दादाराव तेली,उपाध्यक्ष मिश्रीलाल तेली,राधेश्याम माहोर यांनी प्रत्येकी 21000₹ आणि पिंपळगाव स्थानिक समाज बांधवानी कैलास नैनाव, डॉ.सुनील ढाकरे नामदेव नैनाव, पांडुरंग तेली,ज्ञानेश्वर ढाकरे,अजय नैनाव, विजय नैनाव, ज्ञानेश्वर पंचोले यांनी प्रत्येकी 11000₹अश्या देणग्या आज जाहीर केल्या हा कार्यक्रम म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्यां सामूहिक विवाह सोहळ्याची रंगीत तालीम आहे असे मान्यवरांनी सांगितले समाजाचे भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळा पिंपळगाव येथे होणार आहे त्याला जास्तीतजास्त सहभाग नोंदवून समाजानि फायदा करून घ्यावा असे आवाहन मान्यवरांनी केले

हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी पिंपळगाव तेली समाज पुरुष कमिटी आणि तेली समाज महिला कमिटी तसेच समाज बांधव आणि युवा वर्ग यांनी परिश्रण घेतले असे पिंपळगाव कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत माहोर यांनी सांगितले ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष चंद्रकांत माहोर यांनी तर सूत्रसंचलन कमिटी सदस्य अजय नैनाव सर यांनी केले.