सतिश गोपाळ वार्ताहार (पाचोरा)
दिनांक :-२४/११/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल पवार व इतर कर्मच्याऱ्यांनी अवैध धंद्याच्या विरोधात धडक मोहीम सुरु केली असून मागील काही दिवसांपूर्वी शिंदाड व गहुले शिवारातील गावठी दारुचे निर्मीती अड्डे उध्दवस्त केले तसेच कुऱ्हाड येथेही अवैध दारुच्या सुट्टीवर धाडसत्र राबण्यात आल्यामुळे अवैध धंदे करणारांची पायाखालची वाळू सरकली आहे.
तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे साहेब यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचत आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन काल दिनांक २३ नोव्हेंबर बुधवार रोजी सावखेडा शिवारातील सुभाष बाबूराव पाटील यांच्या मालकीच्या गट नंबर ६१/०१ मध्ये दुपारी एक वाजता छापा टाकला या छाप्यात सुभाष बाबूराव पाटील यांच्या शेतात लहान मोठी २०० गांज्याची झाडे आढळून आली ही झाडे उपटून ताब्यात घेण्यासाठी पोलीस कर्मचारी व काही स्थानिकांची मदत घेऊन ६०० किलो वजनाचा अंदाजे किंमत ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन शेतमाक सुभाष बाबूराव पाटील यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी दिली असून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले.



तसेच या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांचे विशेष सहकार्य मिळत असून पोलिस कॉन्स्टेबल रणजित पाटील, संदीप राजपूत, अभिजित निकम , अरुण राजपूत, प्रमोद वडिले, अमोल पाटील , दीपक सोनावणे व इतर कर्मच्याऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच पाचोरा तालुका नायब तहसीलदार संभाजी पाटील सावखेडाचे पोलीस पाटील प्रवीण परदेशीं हे घटनास्थळी हजर होते






