जि. प . प्राथमिक शाळा, कोल्हे येथील विद्यार्थीनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण.

0
187

सतिश गोपाळ

मुख्य संपादक(पाचोरा) 

दिनांक :१२ /११ /२०२२

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ चा निकाल आहीर झालेला असून यामध्ये इ. पाचवी ची विद्यार्थीनी वैष्णवी विनोद हटकर हिने घवघवीत यश संपादन केलेले आहे, वैष्णवी या ग्रामीण भागात असलेल्या शाळेची शिष्यवृत्ती साठी पात्र होणारी पहिली विद्यार्थीनी आहे.या यशामध्ये निश्चितच तिच्या आई वडीलांचा आणि वर्ग शिक्षण श्री प्रविण जोहरे सर यांचा सिंहाचा वाटा आहे. श्री जोहरे सर यांनी मुख्याध्यापक श्री. प्रशांत बडगुजर तथा सहकारी शिक्षक, पिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. शांताराम कुंभार दादा, पाचोरा पं.स.चे गटशिक्षणाधिकारी श्री. नरेंद्र चौधरी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे आणि त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. नमुद्रसदर विद्यार्थीनीचे अभिनंदन मुख्याध्यापक तथा शिक्षक, शा.व्य.स. अध्यक्ष असलम तडवी, तथा सदस्या सरपंच अशोक सुरडकर तथा ग्रा.पं. सदस्य, कोल्हे कृषी तंत्र विदयालयाचे संस्थापक – अध्यक्ष श्री रमेशजी बाफना तथा गावकरी यांनी केले.