मुख्य संपादक: सतिष गोपाळ
पाचोरा दि. २२/०९/२०२६
पाचोरा शहरातील दत्त कॉलनी येथील ‘दत्ताचे चिमुकले गणेश मित्र मंडळा’तर्फे गणेशोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरणात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. महाआरतीचा मान लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुनीता ताई किशोर आप्पा पाटील यांना देण्यात आला.
‘दत्ताचे चिमुकले गणेश मित्र मंडळ’ गेल्या ११ वर्षांपासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून, महाआरतीसाठी परिसरातील नागरिक, महिला भगिनी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणपती बाप्पाच्या चरणी श्रद्धेने केलेली प्रार्थना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा असून, त्याच भक्तिभावातून महाआरती मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी मंडळाच्या वतीने पुढील वर्षीच्या महाआरतीसाठी आ. किशोर आप्पा पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळात जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी उपस्थित राहावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
दरम्यान, वैष्णवी ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. शितल बंडू सोनार यांचा वाढदिवसही यावेळी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.




