मालेगाव डोंगराळेच्या चिमुरडीवरील अमानुष अत्याचारानंतर पिंपळगाव हरेश्वरमध्ये संतापाची लाट; २७ नोव्हेंबरला बंद व मूक मोर्चा.

मुख्य संपादक: सतिश गोपाळ
(पाचोरा) दि.२६/११/२०२६
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साडे तीन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर तिची निघृण हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. समाजमनाला चीड आणणाऱ्या या जघन्य कृत्याचा सर्वत्र तीव्र निषेध होत असून आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी देशभरातून जोर धरत आहे.

या पार्श्वभूमीवर पीडितेला न्याय मिळावा आणि अशा अमानुष घटनांना आळा बसावा, या मागण्यांसाठी पिंपळगाव हरेश्वर ग्रामस्थांनी गुरुवार, दिनांक २७नोव्हेंबर गुरुवार रोजी कडकडीत बंद आणि मूक मोर्चाचे आवाहन केले आहे. ग्रामस्थ, सामाजिक संस्था, महिला मंडळे, युवक संघटना यांच्यासह व्यापारी वर्गानेही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे.

मूक मोर्चा गुरुवारी सकाळी ८ ते १० या वेळेत काढण्यात येणार असून, कोणताही नारा न देता शांततेत हा मोर्चाची सुरुवात गोविंद महाराज मंदिरापासून होणार असून पुढे शनी चौक, जुनी ग्रामपंचायत, विठ्ठल मंदिर चौक, बाजारपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, राजे संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गावातील प्रमुख चौकांत स्वयंसेवक तैनात राहणार असून मोर्चादरम्यान पूर्ण शांतता आणि शिस्त पाळली जाणार आहे. अत्यावश्यक सेवांस वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

गावकऱ्यांची एकजूट, न्यायासाठी ठाम भूमिका.

घटनेबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून, “चिमुरडीसाठी न्याय मिळवणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे” असा स्वर सर्वत्र उमटत आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशा घटना थांबाव्यात आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, या मागण्यांसाठी गाव एकदिलाने पुढे सरसावले असून मूक मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभागाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आदर्श आणि शांततापूर्ण मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला आहे.
पिंपळगाव हरेश्वरमध्ये मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता गाव न्यायासाठी ठामपणे उभे राहत असल्याचे स्पष्ट होत आहे. निरागस बालिकेवरील अत्याचाराचा कठोर निषेध करण्यासाठी व गुन्हेगारांना कडकात कडक शिक्षा व्हावी यासाठी हा मूक मोर्चा महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच या मोर्चाचे नियोजन व समन्वयासाठी श्वेता सीमा विनोद पाटील यांच्या पुढील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क: ७८७५०१७६३७ साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपळगाव हरेश्वरमध्ये मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता गाव न्यायासाठी ठामपणे उभे राहत असल्याचे स्पष्ट होत आहे. निरागस बालिकेवरील अत्याचाराचा कठोर निषेध करण्यासाठी व गुन्हेगारांना कडकात कडक शिक्षा व्हावी यासाठी हा मूक मोर्चा महत्वपूर्ण ठरणार आहे.