पिंपळगाव हरेश्वर पोलीसांकडून ३७४०० रुपयांची देशी दारु जप्त एकास अटक.

मुख्य संपादक :सतिष गोपाळ
दि.22/07/2025
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला नव्सयानेच हजर झालेल्या हाय्यक पोलीस निरीक्षक मा. कल्याणी वर्मा यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी वॉश आऊट मोहीम सुरु केली असून यासाठी गावागावांतून गुप्त माहिती काढून कारवाईचा सपाटा सुरु केला असल्याचे दिसून येत आहे.

याच वॉश आऊट मोहीमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कल्याणी वर्मा यांना वरसाडे प्र. पा. या गावात सुभाष गणा राठोड हा इसम त्याच्या घरात देशी दारुची चोरटी विक्री करत असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे काल दिनांक २१ जुलै २०२५ सोमवार रोजी सायंकाळी पोलीस हेडकॉन्स्टेबल तात्याबा नांगरे, अरुण राजपूत, पोलीस नाईक राहुल बेहेरे, रविंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद वाळले, अमोल पाटील, सागर पाटील, महिला पोलीस शिपाई योगिता चौधरी यांना सोबत घेत वरसाडे प्र. पा. गावात धाड टाकून ३७४००/०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक केली आहे.

या कारवाईत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वरसाडे प्र. पा. येथील सुभाष गना राठोड याच्या घरी जाऊन झाडाझडती घेतली असता टँगो पंच नावाच्या देशी दारुचे नऊ खोके प्रत्येक खोक्यात ९० मीली मापाच्या शंभर तसेच या व्यतिरिक्त ३५ अशा एकूण ३७,४००/०० रुपये किंमतीच्या ९३५ बाटल्यांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस कॉन्स्टेबल गोविंद वाळले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर १८३/२०२५ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. कल्याणी वर्मा यांचे आदेशान्वये पोलीस हेडकॉन्स्टेबल तात्याबा नागरे हे करीत आहेत.
संबंधित अवैध दारु विक्रेत्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात देशी दारुचे खोके आढळून आले असून हे दारुचे खोके त्याने कुठून आणले होते ? तसेच एकाच व्यक्तीला दारु विकत देतांना संबंधित मान्यताप्राप्त देशी दारु दुकानाच्या मालकाने इतक्या मोठ्या प्रमाणात दारु विकत दिलीच कशी व कोणत्या नियमानुसार दिली याबाबत सविस्तर तपास करत नियमबाह्य देशी दारुची विक्री करणाऱ्या देशी दारुच्या दुकानावर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कारण देशी दारुच्या दुकानातून नियमबाह्य पद्धतीने खोकेच्या, खोके दारुची विक्री केली जात असल्याचे दिसून येत असून यामुळे गावागावात अवैध पध्दतीने देशी दारुची विक्री करण्याऱ्या व्यवसायीकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून ही बाब पोलीसांसाठी एक डोकेदुखी ठरत असल्याने अशा नियमबाह्य पद्धतीने दारु विक्री करण्याऱ्या दुकानावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिक व महिलांनी केली आहे.