पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन यांची वरसाडे येथील हातभट्टीवर मोठी कारवाई.

मुख्य संपादक: सतिश गोपाळ

(पाचोरा) दि:06/11/2024

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपळगाव हरेश्वर ते वरसाडे रस्त्यालगत असलेल्या नाल्यात झाडाच्या आडोशाला कुणीतरी इसमाने गावठी हातभट्टीची दारु तयार करुन विक्री करण्याच्या हेतूने हातभट्टी दारु निर्मितीसाठी लागणारे रसायन व हातभट्टीची दारु गाळत असल्याची गुप्त माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिहितीच्या आधारे पिंपळगाव हरेश्वर ते वरसाडे रस्त्यालगत असलेल्या नाल्यात झाडाच्या आडोशाला जाऊन पाहिले असता त्याठिकाणी युनुस भिकन तडवी राहाणार पिंपळगाव हरेश्वर वर्षे ५७ हा गावठी हातभट्टीची दारु गाळत असतांना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करुन गुन्हा रजिस्टर नंबर २९३/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम (६५ फ) प्रमणे रितसर कारवाई करण्यात आली आहे.


या कारवाईत ३५०००/०० रुपये किंमतीचे गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन भरलेल्या २०० लिटर मापाच्या पाच प्लॅस्टिक ड्रम (टाक्या) जागेवर नष्ट करण्यात आल्या आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल शांतीलाल पगारे, इमरान पठाण यांचा सहभाग होता.